⚡सावंतवाडी ता.१३-: कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्यावतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर दोन गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी ते सातवी पहिला गट, निबंधाचा विषय – छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी बाणा. प्रथम क्रमांक महेश रुपेश कातळकर. मळगाव हायस्कूल, द्वितीय क्रमांक तन्वी प्रसाद दळवी, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी, तृतीय क्रमांक आर्या प्रकाश सावळ, मळगाव प्राथमिक शाळा सावळ वाडा. उत्तेजनार्थ बक्षीस अक्षरा अनिल राऊळ, शिरशिंगे प्राथमिक शाळा २ आणि सानवी रवींद्र सावंत, सुधाताई कामत विद्यामंदिर सावंतवाडी.
इयत्ता आठवी ते नववी मोठा गट, निबंधाचा विषय – कवी कुसुमाग्रज यांचे साहित्य आणि कविता. प्रथम क्रमांक श्रुती शिवाजी पोपकर इन्सुली हायस्कूल, द्वितीय क्रमांक श्रावणी राजन सावंत, कलंबिस्त हायस्कूल, तृतीय क्रमांक कृष्णा महेश पास्ते, मीलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी. उत्तेजनार्थ बक्षीस ज्ञानेश्वरी नकुल सावंत, माजगाव हायस्कूल यांना जाहीर झाले आहे.
ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या मातोश्री स्व. सौ.मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धा विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस प्रथम क्रमांक ३५० रु. द्वितीय क्रमांक २५० रु. व तृतीय क्रमांकास २०० रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील.
शुक्रवार दिनांक १५ मार्च रोजी आरपीडी हायस्कूल येथील सभागृहात सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, विनायक गावस यांनी केले आहे.
