सावंतवाडी पालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन…

भविष्य निर्वाह निधी जमा न केल्याचे कारण ; मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनाअंती आंदोलन मागे..

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांनी ठेकेदाराकडून आपल्या खात्यावर भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याने अचानक मंगळवारी काम बंद आंदोलन छेडले त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या कामामध्ये व्यत्यय आला दरम्यान येत्या पंधरा दिवसात भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर जमा करण्याचे आश्वासन सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सागर साळुंखे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

या काम बंद आंदोलनामध्ये नगर परिषदेचे सफाई कामगार आणि घंटागाडी कामगार असे एकूण 40 जण सहभागी झाले होते त्यामुळे सावंतवाडी शहरातील कचरा आज उचलला गेला नाही
गेल्या काही दिवसापासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर जमा होत नसल्याची बाब वेळोवेळी कंत्राटी कामगारांनी ठेकेदारांच्या निदर्शनास आणून दिली होती मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेरीस आज मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगार व घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन छेडले व कामगारांनी सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर तलावा काठी आंदोलन सुरू केले
अखेरीस तातडीने यावर तोडगा काढत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी पंधरा दिवसात भविष्य निर्वाह निधी आपल्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनामध्ये बाबू खोरांगडे बाबू कदम सचिन कदम नितीन कदम कृष्णा पालयेकर विनोद काष्टे गणेश लाखे श्री पोखरे श्री मयेकर तर महिला कामगार गीता खोरागडे भारती लाखे आदी 40 कामगार सहभागी झाले होते

You cannot copy content of this page