रुग्णवाहिकेतून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक…

आंबोली चेक नाका येथे पोलिसांची कारवाई..

⚡आंबोली ता.१२-: आंबोली पोलीस तपासणी नाका येथे मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारा एक रुग्णवाहिका संशयास्पद रित्या येताना दिसली या रुग्णवाहिका क्रमांक mh09fl3395 याला बाजूला घेऊन त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या दीपक शिंदे यांनी या रुग्णवाहितीची तपासणी केली असता त्या रुग्णवाहिकेत गोवा बनवटीची दारू वाहतूक करत असल्याचा संशय होता काल रात्री या रुग्णवाहिकेला पकडण्यात यश आले.

यावेळी रुग्णवाहिकेसह तब्बल साडे अकरा लाख लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई अभिजीत कांबळे दीपक शिंदे यांनी केली अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत. यावेळी संशयित म्हणून गडहिंग्लज येथील तिघांना ताब्यात घेण्यात आलेसंजय मनोहर कल्याणकर वैशालीस विनायक शिवाजी पालकर व भिकाजी शिवाजी तोडकर वय 43 यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले

You cannot copy content of this page