नारूर येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू…

⚡कुडाळ ता.१२-: कुडाळ तालुक्यातील नारूर काटकरवाडी येथील महिला सौ रश्मी रामकृष्ण सरनोबत वय ३६ या महिलेचा आपल्या राहत्या घरी आकस्मिक मृत्यू झाला . ही घटना ११ मार्च रोजी सायंकाळी ४.४५ वा च्या सुमारास निदर्शनास आली.
यातील महिला सौ रश्मी सरनोबत ही तिची तब्येत ठीक नसल्याने सकाळी पती रामकृष्ण सरनोबत यांच्या समवेत डॉक्टरकडे जाऊन आली होती. यानंतर पती रामकृष्ण हे शेतात सायंकाळी ४ वा. कामाला गेले होते. यावेळी सौ रश्मी यांनी आपण मागाहून येते असे सांगितले. यानंतर पत्नी कामाला न आल्याने पती रामकृष्ण यांनी परत घरी जाऊन पाहिले यावेळी पत्नी जमिनीवर पडलेल्या स्थितीत व मुठ घट्ट आवळलेल्या स्थितीत आढळली. यावेळी त्यांना हलविण्याचा प्रयत्न केल्यावर कोणतीही हालचाल नव्हती. यानंतर काही जणांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनीही येवून पाहिल्यावर तिची कोणतीही हालचाल नव्हती.यावेळी ती मयत झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर पती रामकृष्ण सरनोबत यांनी या घटनेची फिर्याद कुडाळ पोलिसात मंगळवारी दिली असून या घटनेची नोंद कुडाळ पोलीसात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

You cannot copy content of this page