दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम इमारतीचे भूमिपूजन…

शिक्षण मंत्री केसरकर यांनी एक कोटी 51 लाख रुपयांचा मंजूर केला निधी..

⚡दोडामार्ग ता.१२-: येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन
नुकतेच करण्यात आले. या कार्यालयासाठी १ कोटी ५१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाची ४० गुंठे जमीन आहे. सध्याचे कार्यालय बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात थाटण्यात आले आहे.नवी इमारत पूर्ण झाल्यावर पुन्हा विश्रामगृह सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान,इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक चांधकाम तया जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे ऑनलाईन प्रणालीद्वारे या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी झाले होते .तर प्रत्यक्ष भूमिपूजनावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस,विभागप्रमुख रामदास मेस्त्री, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, गुरू सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page