⚡देवगड ता.१२-: श्री देव कुणकेश्वर यात्रोत्सव निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचा तसेच देवगड संपर्क अध्यक्ष नितीन पवार तसेच देवगड पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी उप जिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री विधानसभा प्रसिद्धी प्रमुख महेश नलावडे,तालुकाध्यक्ष रूपेश पांगम,मिठबाव सह संपर्क अध्यक्ष मंगेश कातवणकर,कातवण विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर महाराष्ट्र सैनिक विजय शिंगाडे,महेश झोरे,प्रकाश बोडेकर, बंड्या बोडेकर,सुनील कोकरे,गोविंद झोरे,तेजस शिंगाडे,प्रवीण झोरे, महेश पवार, आरिफ नदाफ इत्यादी उपस्थित होते.
