कुडाळ :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या वतीने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध सराव परीक्षा २०२४ व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच करण्यात आला.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सराव व्हावा हा हेतू ठेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या वतीने इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध सराव परीक्षा व जिल्हा शाखेकडून इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मराठा समाज सभागृह कुडाळ सभागृहात संपन्न झाला.या सोहळ्याला सर्व गुणवत्ता धारक विद्यार्थी त्यांचे पालक व शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून लक्ष्मण आगलावे, नवनाथ जाधव, श्रीम. गोसावी उपशिक्षक शाळा कुडाळ पडतेवाडी यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न झाले. गुणगौरव सोहळ्यात टाॅप टेन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,मेडल देऊन गौरविण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात कुडाळ तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळांचा गौरव करण्यात आला.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या या अभिनव उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ चे अध्यक्ष शशांक आटक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना पुढील वर्षी तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले. तसेच या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थाना तज्ञ मार्गदर्शकांचा एकदिवसीय मार्गदर्शन वर्ग घेतला जाईल. या गुणगौरव सोहळ्याचे औचित्य साधून व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष शशांक आटक, राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर, जेष्ठ सल्लागार चंद्रकांत अणावकर ,राज्य कार्यकारिणी सदस्य दादा जांभवडेकर, सल्लागार दिनकर तळवणेकर, जिल्हा शिक्षक नेत्या श्रीमती सुरेखा कदम,माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, माजी जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक विजय सावंत, श्री पटाडे ,महीला आघाडी तालुकाध्यक्ष श्रीमती संजना पेडणेकर, सरचिटणीस श्रीमती गौरवी बांबर्डेकर,महिला आघाडीच्या सौ.सानिका मदने,तालुका कार्याध्यक्ष महेश कुंभार, तालुका उपाध्यक्षा संजना राऊळ, तालुका संपर्क प्रमुख भार्गवी कापडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश गावडे, आभार एकनाथ सावंत,तर सुत्रसंचालन बाबाजी भोई यांनी केले.
कुडाळ तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात..
