देवगड ता.१२-:
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमध्ये २० कोटी ७२ लाख रुपयांचा विकास कामांकरिता आवश्यक असणाऱ्या निधी आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने प्राप्त झाला असून याकरिता केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांचे विशेष आभार भाजप नगरसेवक नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
या विकास निधी मध्ये जिल्हा वार्षिक योजना सन २०२४ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान यामधून ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत निधी २०२२ करिता २ कोटी ७५ लाख वैशिष्ट्यपूर्ण योजना सन २०२२-२३ याकरिता १ कोटी ९३ लाख वैशिष्ट्यपूर्ण योजना सन २०२२-२३ करीत ३ कोटी ३८ लाख जिल्हा वार्षिक योजना सन २०२४ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरस्थान १ कोटी ९८ लाख विकास कामे सन २०२४ ७६ लाख ५० हजार वैशिष्ट्यपूर्ण योजना सन २०२३-२४ करीता ४ कोटी सन २०२४ साठी १ कोटी ४२ लाख असा एकूण २० कोटी ७२ लाख रुपयांचा निधी विकास कामांकरिता प्राप्त झाला आहे.
फोटो-आम.नितेश राणे
