कुडाळ एसटी स्टँड आवारात स्वच्छता मोहीम…

⚡कुडाळ ता.१२-: राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळ अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून मुंबई आणि ठाणे विभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकसहभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक एसटी स्थानकावर स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, मंगळवारी सकाळी कुडाळ एसटी स्टँड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी एसटी बसस्थानकात साचलेला कचरा साफ करण्यात आला. त्यानंतर प्रसाधनगृहे साफ करण्यात आली. संपूर्ण एसटी स्टँड पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले. तसेच स्टँडच्या मागे – पुढे असलेला कचरा सुद्धा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी प्रभारी आगार व्यवस्थापक संजय नर, वैभव वंजारे, सचिन शिंदे, साईनाथ पारकर, विनायक पाटील, सोनाली तेरसे, प्रसन्ना चव्हाण, रघुनाथ घाडी, संतोष चव्हाण, संजय कोरागडे तसेच चालक, वाहक यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

You cannot copy content of this page