पाच हजार आठशे पन्नास लाभार्थ्यांना सिंदूर रत्न योजनेमधून लाभ…

मंत्री दीपक केसरकर: टीका करणारे टीका करत राहतात,आपण कामाला महत्त्व द्यायचं..

⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लाभ आजपासून तुम्हाला मिळणार आहे. त्यांची सबसिडी देखील मिळणार आहे‌. जवळपास पाच हजार आठशे पन्नास लाभार्थ्यांना या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे‌. प्रशिक्षण घेतलेल्यांना सामुग्री उपलब्ध करून देण्यात आल्यान आता उत्पन्न सुरु होणार आहे‌, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.

दरम्यान काजू बोंड प्रकियेसाठी आलेले ५०० अर्ज मंजूर करण्यात येत आहेत. त्यासाठी जे लागेल ते सहकार्य केलं जाईल, काजूचा हंगाम चुकता कामा नये असं मत त्यांनी व्यक्त केल. तर टसर रेशीम निर्मिती प्रकल्पासाठी ६० लाख रूपये प्रशासनाकडे दिले आहेत. निश्चितच हा प्रकल्प आपल्याकडे यशस्वी होईल, त्यासाठी आजपासूनच मेहनत घ्या अशा सुचना दीपक केसरकर यांनी प्रशासनास केल्या.ते सावंतवाडीत येथील आयोजित टसर रेशिम निर्मिती प्रक्रिया मार्गदर्शन व यंत्रसामुग्रा अनुदान मंजुरी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी दीपक केसरकर पुढे म्हणाले, शेतजमीन वापरात यावी यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. सिंधुदुर्गतील कोणतीही शेतजमीन रिकामी राहणार नाही याची काळजी घ्या, दुबार पीक घ्यायचे असल्यास कृषी खात्याच सहकार्य आपल्याला राहील. दोडामार्गमध्ये पाटाच पाणी जाणाऱ्या भागात हळदीच पीक घेतलं जाणार आहे. आपला जिल्हा हा सोन्याची खाण आहे‌. काजू संदर्भात ब्राझील सोबत सरकार करार करणार आहे. काजूचा रस मोठ्याप्रमाणात घेतला जाणार आहे. काजूच उत्पादन वाढविण्यासाठी पाणी देण्यासह बी खरेदी करण्याची योजना करण्यात आली आहे. अर्थखात्याकडून आपल्या संपूर्ण सहकार्य मिळेल. जलदगतीने काम करताना समर्पणातून काम करणं आवश्यक आहे. पर्यटनाच्या सगळ्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. ज्यावेळी प्रकल्प बांधून पूर्ण होईल त्यावेळी सबसिडी देखील दिली जाईल. सगळ्या योजनांचे पैसे संबंधित विभागाकडे दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करण्याची ताकद इथल्या लोकांत आहे. कमीत कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प इथे उभारण्यात यावेत. १७७ जणांना दुधाळ जनावरे देण्यात येणार आहे‌. देशी गाई दिल्या जाणार आहे. दुध विकत घेण्याचा करार केला जाणार आहे. कुक्कुट ग्राम अंतर्गत कोंबड्या देण्यात आल्या असून ‘हॅपी एग्ज’ खरेदी करण्याची सोय देखील करण्यात आली आहे. दहा रूपयांचा दर प्रति अंड्याला देण्यात आला आहे‌. प्रत्येक गोष्ट मतांसाठी करायची नसते. टीका करणारे टीका करत राहतात‌. आपण कामाला महत्त्व द्यायचं असतं. तुमची सगळ्यांची साथ लाभल्यास सिंधुरत्न समृद्ध योजना निश्चित यशस्वी होईल. काही योजना आचारसंहिता संपल्यावर जाहीर करण्यात येतील. सर्व यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत असून निश्चित आपल्या प्रयत्नांना यश येईल असं दीपक केसरकर म्हणाले.

You cannot copy content of this page