इच्छाशक्ती जिद्द आणि जिज्ञासा यामुळे ध्येय मिळते…

साळ सरपंच सावित्री गाडी यांचे प्रतिपादन..

⚡दोडामार्ग, ता.११-: इच्छाशक्ती, जिद्द आणि जिज्ञासा असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो .यशासाठी प्रयत्न करणे मात्र गरजेचे असते.अशक्य असे या जगात काहीच नाही,असे मत साळ (डिचोली-गोवा) येथील सरपंच सावित्री घाडी यांनी व्यक्त केले .येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समिती विभागामार्फत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या
महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी ताराबाई, सावित्रीबाई फुले,सिंधुताई सपकाळ, अहिल्याबाई होळकर ,राजमाता जिजाऊ, गंगुबाई काट्यावाला अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांच्या वेशभूषा साकारत सादरीकरण केले या स्पर्धेमध्ये कुमारी साक्षी रामकृष्ण गवस हिने प्रथम क्रमांक पटकावला वैष्णवी परशुराम कदम हिने द्वितीय क्रमांक तर ऋतिका राजन नाईक हिने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.संजय खडपकर यांनी केले .
यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्त्या सावित्री घाडी,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुभाष सावंत ,महिला विकास कक्ष प्रमुख प्रा.प्रियांका गवस ,प्रा.सेफाली गवस प्रा. दर्शन कोटकर व विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रेया नाईक उपस्थित होत्या.
प्रास्ताविक प्रा. सेफाली गवस यांनी,सूत्रसंचालन प्रा. प्रियांका गवस यांनी व आभार प्रा.दर्शनी कोटकर यांनी मानले.

You cannot copy content of this page