⚡दोडामार्ग, ता.११-: मणेरी येथील माऊली मंदिरासमोर सभागृह बांधण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून 15/25 योजनेमधून या सभामंडपासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यासाठी देवस्थानचे मानकरी तथा युवासेनेचे तालुकाध्यक्ष भगवान गवस यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला. त्यांच्याच हस्ते सभामंडप बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी माजी सरपंच विशांत तळवडेकर,शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, रामदास मेस्त्री, मणेरीतील ग्रामस्थ, मानकरी आदी उपस्थित होते.
मणेरीतील सभागृहाचे भूमिपूजन…
