टेक्नॉलॉजी सेंटरसह खादी शोरूम दोन सीडीपी क्लस्टर जिल्ह्यात आणले…

अडीच वर्षाच्या मंत्री कालावधीत केलेल्या कामांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली माहिती..

ओरोस ता ११
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 186 कोटी रुपये खर्चाचे टेक्नॉलॉजी सेंटर कुडाळ येथे खादी शोरूम प्रत्येकी 30 कोटी रुपये खर्चाचे दोन सीडीपी क्लस्टर मंजूर केले असल्याची माहिती केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत देत केंद्रीय मंत्री पदाच्या काळात राहणे यांनी जिल्ह्यासाठी काय केले असे प्रश्न करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिले आहे
अडीच वर्षाच्या केंद्रीय मंत्री पदाच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राबविलेल्या योजनांची तथा प्रकल्पांची माहिती देण्यासाठी मंत्री राणे यांनी पडवे येथील आपल्या एस एस पी एम मेडिकल कॉलेज येथे सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते
यावेळी पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नरेंद्र राणे यांनी केंद्राच्या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागाचे मंत्रीपद गेली अडीच वर्षे आपण सांभाळत आहोत या केंद्रीय मंत्री पदाच्या कालावधीमध्ये आपण सिंधुदुर्ग नगरी येथे 186 कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर केले आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला आहे तसेच कणकवली येथे कॉलर रिजनल ऑफिस व शोरूम सुरू केले आहे कुडाळ येथे खादी शोरूम सुरू केलेला आहे सिंधुदुर्ग नगरी येथे एससी एसटी हबचे ऑफिस सुरू केले आहे कणकवली येथे लेमन ग्रास पासून ऑइल बनवण्याचा प्रोजेक्ट आणला आहे वेंगुर्ली तालुक्यातील वजराट येथे खादी संस्था सुरू केली आहे तसेच प्रत्येकी 30 कोटी रुपये खर्चाचे दोन सीडीपी क्लस्टर मंजूर केले आहेत अगरबत्ती उद्योगासाठी 70 मशीन चे वाटप केले असून जिल्ह्यातील कुंभार समाजाचे सशक्तिकरण करण्याचासाठी सत्तर मशीन वितरित करण्यात आले आहेत मधमाशी पालनासाठी 330 बॉक्स वितरित केले असून लेदर व फुटवेअरचे 55 किट वितरित करण्यात आले आहेत पी एम ई जी पी अंतर्गत 358 युनिट सुरू झाले आहेत यामधून दहा कोटी 14 लाख रुपयांची सबसिडी दिली आहे त्यामुळे 3200 लोकांना रोजगार मिळाला आहे. याशिवाय वंदे भारत ची सुरुवात केली असून दिवा एक्सप्रेस ला वैभववाडी येथे थांबा मिळवून दिला आहे.

You cannot copy content of this page