जिल्ह्याचा आर्थिक विकास सुधारण्यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सेंटर…

भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती

ओरोस ता ११
2030 मध्ये भारत अर्थव्यवस्थेत जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहभाग राज्य व देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असावा यासाठी माझा प्रयत्न आहे म्हणूनच केंद्राच्या लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग विभागाच्या वतीने या ठिकाणी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर केली आहे यामुळे येथील तरुण प्रशिक्षित होऊन मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये कामाला लागतील काही तरुण स्वतःचा व्यवसाय उभा करतील परिणामी जिल्ह्याचा आर्थिक विकास साधला जाईल असे प्रतिपादन केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथे बोलताना केले
केंद्राच्या लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने सिंधुदुर्ग नगरी येथे 165 कोटी 28 लाख खर्चाचे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर करण्यात आले आहे वीस एकर जागेमध्ये होणाऱ्या या सेंटरचा सिलान्यास मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज संपन्न झाला यावेळी विभागाचे अपर सचिव डॉ रजनीश, जिल्हाधिकारी किशोर तावडे नागपूर येथील संचालक प्रशांत पार्लेवार सहसंचालक राहुल कुमार मिश्रा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी खासदार निलेश राणे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी आमदार राजन तेली भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर किशोर काळे सुप्रियावालोकर सुधा केसरी पी टी डोईफोडे यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे यांच्या हस्ते या ठिकाणी भरविण्यात आलेल्या उद्योग प्रदर्शनाचे फिट कापून शुभारंभ तसेच टेक्नोलॉजी सेंटरचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राणे यांच्या हस्ते नव उद्योजकांना मंजूर झालेल्या कर्जाचे वितरण करण्यात आले

You cannot copy content of this page