⚡बांदा ता.११-: स्वयंदीप समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात महारक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी १६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सारंग, डॉ. मयुरेश पटवर्धन, बांदा सरपंच प्रियांका नाईक, निवृत्त विस्तार अधिकारी सदाशिव आयनोडकर, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, प्राथमिक शिक्षक शांताराम असनकर, सत्यशोधक दीव्यांग संघटनेचे एम. पी. जाधव, संस्थेचे अध्यक्ष उदय सरमळकर, उपाध्यक्ष तुषार कानसे व सचिव लाडू पिळगावकर उपस्थित होते.
डॉ. सारंग म्हणाले, रुग्णालयांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा आहे. सर्वसामान्य गरीब रुग्ण व नातेवाईकांची रक्तामुळे धावपळ होते. संस्थेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब आहे. संस्थेने भविष्यातही असे विधायक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. ओरोस उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
स्वयंदीप समता प्रतिष्ठानतर्फे बांद्यात महारक्तदान शिबीर संपन्न
