गावराई येथील २५ लाखाच्या विविध रास्ता विकास कामाची प्रभाकर सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡ओरोस ता ११-: गावराई येथील २५ लाखाच्या विविध रास्ता विकास कामाचे भूमीपुजन आज भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत याच्या हस्ते पार पडले.

कुडाळ तालुक्यातील गावराई गिरोबा मंदीर येथे सौरपथ दिप ,ग्रा .प गडकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी ४ लाख , वेगुर्लेकर वाडी धुरीवाडी मार्ग ५ लाख , तेलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी ५लाख अशी एकूण २५ लाखाची कामे नव्याने मंजूर केली आहेत. या कामांचा भूमिपूजन सोहळा आज भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हि कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. उर्वरीत नव्याने विकासकामे मंजूर करून गावराई गावातील प्रश्नाना न्याय देऊ असे आश्वासन यावेळी प्रभाकर सावंत यांनी उपस्थित ग्रामस्ताना दिले.

      याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरपंच सोनल  शिरोडकर, ग्रा प सदस्य प्रणाली मेस्त्री ,संजय आयरे, रूपाली वाईरकर भाजपाबुथ अध्यक्ष आशुतोष सावंत , दाजी गावडे , प्रकाश परब , जिजी  गावडे , लक्ष्मीकांत शिरोडकर ,अमित राणे आदींसह  गावातील ग्रामस्थ ठिकठिकाणी मोठ्या सख्येने उपस्थित होते. गावराई येथील गिरोबामंदीर सौरपथदिप सह ग्रा.प गडकरवाडी बौद्ध वाडी टेमवाडी रस्त्या सह भूमीपुजन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले या वेळी उपस्थीत सरपंच सोनल शिरोडकर ग्राप सदस्य व ग्रामस्थ

You cannot copy content of this page