भौतिक सुविधातंर्गत विस्तारित वर्ग खोल्यांचा उद्या भूमिपूजन…

विनायक राऊत यांची उपस्थिती: ग्रामस्थ व पालकांनी उपस्थित राहावे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांचे आव्हान..

⚡बांदा ता.११-: येथील गोगटे-वाळके महाविद्यालयात भौतिक सुविधातंर्गत विस्तारित वर्ग खोल्यांचा भूमिपूजन समारंभाचे आयोजन मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आले आहे. यावेळी खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत.

खासदार संजय राऊत यांच्या स्थानिक विकास क्षेत्र निधीतून आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या विस्तारित वर्ग खोल्यांच्या भूमिपूजनाचा समारंभ खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते काॅलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाचे चेअरमन डी. बी. वारंग हे उपस्थित राहणार आहेत. तरी या भूमिपूजन समारंभास महाविद्यालयाचे हितचिंतक, आजी- माजी विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातील व बांदा ग्रामस्थ व परिसरातील पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page