दिपकभाई केसरकर यांच्या प्रयत्नाने कुणकेरी गावांत ७७ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.११-: शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या प्रयत्नाने कुणकेरी भवानी मंदिर रस्ता कॉजवे बांधणे रु. २४.०० लक्ष, कुणकेरी शाळा नं. १ दुरुस्ती करणे रु. १४.०० लक्ष, कुणकेरी पळसाचा दळा कॉजवे बांधणे रु. १२.०० लक्ष, कुणकेरी उपरल देवस्थान कॉजवे बांधणे रु. ५.०० लक्ष, कुणकेरी उपरल देवस्थान संरक्षण भिंत बांधणे रु. ५.०० लक्ष, कुणकेरी भवानीमंदिर ते शिडमापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे रु. ५.०० लक्ष, कुणकेरी भवानी मंदिर सरोंदेवाडी ते उपरल देवस्थान रस्ता मजबुतीकरण करणे रु. ७.०० लक्ष, कुणकेरी सरोंदेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु. ५.०० लक्ष सदर कामांचे भुमिपुजन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे, कुणकेरी सरपंच श्रीम. सोनिया सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले.

यावेळी संजयगांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन नाटेकर, शिवसेना विभागप्रमुख महेश ऊर्फ पप्पू सावंत, महिला आघाडी प्रमुख सौ. निकिता परब, खरेदीविक्री संघाचे व्हा. चेअरमन राजन रेडकर, उपविभाग प्रमुख संदेश सोनुर्लेकर, एकनाथ हळदणकर, उपतालुकाप्रमुख जिवन लाड, श्रीम. रसिका आईर, एकनाथ सावंत, वसंत सावंत, शरद सावंत, सुर्यकांत सावंत, पांडुरंग सावंत, भानुदास सावंत, नाना सावंत, बाशी सावंत, विश्राम सावंत, जितेश कुणकेरकर, तुकाराम कुणकेरकर, प्रकाश सावंत, राजन गावडे, किरण तेंडुलकर, बाबू कुणकेरकर, अमर कुणकेरकर, व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच कुणकेरी गावांतील उर्वरीत विकासकामासाठी रु. ११४.०० लक्ष कामांचे नियोजन प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी दिपकभाई केसरकर यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page