मंत्री दिपक केसरकर:अधिकाऱ्यांसोबत मंत्री केसरकर यांनी केली संपूर्ण जागेची पाहणी..
⚡सावंतवाडी ता.१०-: तालुका क्रीडा संकुल समितीमार्फत सावंतवाडी येथे क्रीडा विभागामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमाने बॅडमिंटन कोर्ट हॉल,बास्केटबॉल ,हॉलीबॉल ,कबड्डी खो-खो या मैदानी खेळांची मैदाने तयार करण्यात येत आहेत . या कामासाठी क्रीडा विभागाकडून पाच कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदरचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मंत्री केसरकर यांनी दिले. येथील प्रस्तावित क्रीडा संकुलाची मंत्री दिपक केसकर यांनी
अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण जागेची
पाहणी केली.
दरम्यान क्रीडा संकुलात समाविष्ट करण्याच्या विविध सुविधांबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले .तसेच जिमखाना मैदानावरील खेळाच्या वेळी प्रेक्षकांना सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी बांधण्याचे निर्देश श्री. केसरकर यांनी यावेळी दिले.बॅडमिंटन हॉल हा इंडोर स्वरूपाचा असून यामध्ये दोन बॅडमिंटन कोर्ट चा समावेश असल्याच देखील केसरकर म्हणाले.
