⚡कुडाळ ता.१०-: परुळे आजार वाडी येथील युवकाचे ओव्हरटेक करणार्या कार च्या धडकेने दुर्दैवी निधन परुळे आजार वाडी येथील रहिवासी पांडुरंग ऊर्फ दाजी हडकर हे सागरी महामार्ग वर रस्ताच कडेला उभे होते त्याचवेळी कुडाळ च्या दिशेने जाणार्या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात हडकर याला जोराची धडक दिली त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. ही घटना आज सायंकाळी 7.30 वा घडली.
दरम्यान धडक देऊन कार चालक तेथे न थांबता निघून जात असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यांना पाट येथे अडवले . त्यानंतर ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत कार चालक यास अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कार चालक यास पोलिसांनी अटक केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. सागरी महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यात वाहन चालक अतिशय वेगाने वाहन चालवताना दिसून येतात मुळात हा मार्ग च्या आसपास वस्ती असल्याने वाहन धारकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कु.पांडुरंग हड कर यांच्या अपघाती मृत्यू मुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वडिल भाऊं .विवाहित बहिणी असा परिवार आहे पांडुरंग यांना शेती ची आवड होती कष्ट करू भुईमूग लागवड केली आहे वडिल आजारपणामुळे जाग्यावर एक भाऊ मुंबई येथे नोकरी करतो अभिनयाची आवड होती त्यामुळे ते एकांकिका स्पर्धा नाटक यामध्ये सहभागी असायचे…
