महिलांनी खंबरीपणे स्वतःच्या पायावर उभे रहा…

नीता कविटकर: वेंगुर्ला शिवसेनच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा..

⚡वेंगुर्ला ता.१०-: महिला दिन साजरा करत असताना प्रत्येक महिलेने आता खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहावे. तसेच संघटित होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष नीता कविटकर यांनी केले.

वेंगुर्ला येथील शिवसेना कार्यालयामध्ये महिला दिन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला वेंगुर्ला शहर प्रमुख अॅड.श्रद्धा बाविस्कर, नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, महिला उपजिल्हाप्रमुख शितल साळगावकर, महिला वेंगुर्ला तालुकाप्रमुख प्राची नाईक, महिला अल्पसंख्यांक सेलच्या शबाना शेख, विभाग प्रमुख सावली आडारकर, पाल उपसरपंच प्राची गावडे, विशेष कार्यकारी अधिकारी रश्मी पेडणेकर, कृतिका कुरले, युवक शहरप्रमुख संतोष परब, काशिनाथ नार्वेकर, संदेश सडवेलकर, प्रभाकर पडते यांच्यासह अन्य महिला व शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी मार्गदर्शन करताना महिलांना बचत गटांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विविध रोजगाराच्या योजना आणल्या जात आहेत. महिलांनी या योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
You cannot copy content of this page