बांदा पोलीस घटनास्थळी दाखल:३ ते ४ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबविली…
⚡बांदा ता.१०-: बांदा शहरातील कट्टा कॉर्नर बाजारपेठेतील चिन्मय नाडकर्णी यांच्या मालकीचे फॅक्टरी आउटलेट काजुगर दुकान अज्ञात चोरट्याने फोडून आतील काजुगर व रोख रक्कम लंपास केली. भर बाजारपेठेत व आजूबाजूला दुकानाची दाटीवटी असूनही नाडकर्णी यांचे दुकान फोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. श्री नाडकर्णी हे मनसेचे बांदा शहरप्रमुख आहेत. त्यांनी अलीकडेच याठिकाणी काजुगर आउटलेट सुरु केले होते. रात्रीच्या वेळी दुकानाचे लॉक कटावणीच्या साहाय्याने तोडून शटर उचकटून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. आतील काजुगर व ३ ते ४ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लांबविली.
