आंबोली पोलीस स्थानकाचे अंमलदार दुधवडकर यांचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू

⚡आंबोली ता.१०-: येथील पोलीस स्थानकात आवारात तुळशीकडे हृदयविकाराचा झटका आल्याने आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दूधवडकर यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला.

ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने जाहीर केले श्री दुधवडकर हे गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत होते त्यानंतर त्यांना आंबोली येथील पोलीस ठाण्यात जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आज सकाळी ते पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना अचानक जोराचा झटका आल्यामुळे ते जागीच कोसळले त्यांना अधिक उपचारासाठी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले परंतु सहकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.दुधवडकर हे परुळे वेंगुर्ला येथील राहणारे आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे.मुलगी वकिलीचे शिक्षण घेत आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ज्योती दुधवडकर यांचे ते पती होत.

You cannot copy content of this page