वैभववाडी शाळा नंबर 1 चा उपक्रम:पालक विद्यार्थी शिक्षक यांची मोठी उपस्थिती..
⚡वैभववाडी ता.०८-: दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळा नंबर 1 येथे महिला दिना निमित्त शिक्षण,राजकीय संरक्षण,व आरोग्य क्षेत्रातील चार महिलांचा सत्कार करुन महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी जि प महिला बालकल्याण सभापती सौ स्नेहलता चोरगे,माजी सभापती सेवा निवृत्त शिक्षिका मिनाताई बोडके, वैभववाडी पोलीस ठाण्याचे महिला पोलिस माधुरी आडुळकर, डॉ सौ दिपाली पाटील मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके, मुख्याध्यापिका दर्शना सावंत, महिला शिक्षिका मनिषा साठे, शिक्षक दिनकर केळकर,चोरगे सर पालक सौ ढवण मॅडम आदी पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
