तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवड..
⚡मालवण ता.०८-: फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीची कार्यकारिणी तीन वर्षासाठी नुकतीच निवडण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी देविदास सुर्वे यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष श्रीमती आरती अशोक कदम, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, उपसचिव भालचंद्र सुतार, कोषाध्यक्ष प्रभाकर सुतार, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर तर सदस्य म्हणून सौ. राधाबाई कांबळी, सौ वनिता हडकर, प्रभाकर कांदगांवकर, सत्यवान सुर्वे,जानु सिताराम कदम,
रमेश कावले, अनंत घाडी, शत्रुघ्न भगत.
सर्वोच्य कमिटी मध्ये दिनकर सहदेव सुर्वे, प्रभाकर रामचंद्र चिंदरकर, सौ. प्रज्ञा प्रभाकर तोंडवळकर,श्रीमती चंद्रकला कावले, शांताराम साळकर. संघ सहायक सदस्य उमेश हडकर, दिनेश सुर्वे, सौ सीमा शेट्ये यांची निवड करण्यात आली. सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने संघाची पुढील वाटचाल होईल असे नवनियुक्त अध्यक्ष देविदास सुर्वे म्हणाले.
