⚡मालवण ता.०७-: वाचन कला विकास समिती, त्रिंबक संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक, ता. मालवण यांनी कै. दादा ठाकूर (आचरे-पारवाडी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार दि २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वा. जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहात जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेत १७ वर्षावरील जिल्ह्यातील कोणीही स्पर्धक सहभाग घेवू शकतो. कमाल वयोमर्यादेचे बंधन नाही. या
स्पर्धेसाठी १) अंधश्रध्दा निर्मूलन काळाची गरज २) सुशिक्षित होवूया की सुसंस्कृत? ३) चांद्रयान मोहिम आणि भारत. ४) छत्रपती शिवराय जाणता राजा. या विषयांपैकी एका विषयावर किमान ६ मिनिटे व कमाल ८ मिनिटे विचार मांडायचे आहेत परिक्षण समितीचा निर्णय सर्व स्पर्धकांना बंधनकारक आहे. विजेत्या स्पर्धकांना संस्थेमार्फत अनुक्रमे प्रथम क्रमांक – २००० रुपये, द्वितीय क्रमांक – १५०० रुपये, तृतीय क्रमांक – १००० रुपये आणि स्मृतीचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात येईल. १० स्पर्धकांच्या वर सहभाग असेल तर उत्तेजनार्थ ५०० रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल पहिल्या १५ स्पर्धकांना प्रवेश देण्यात येईल. प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क दिनांक २५ मार्च २०२४ पर्यंत पोच करावेत. प्रवेश शूल्क प्रती स्पर्धक ५० रुपये असून सादरीकरणानंतर स्पर्धकांना ते परत करण्यात येईल.
या स्पर्धेबाबत सविस्तर माहितीसाठी
श्री. सुरेंद्र सी. सकपाळ (अध्यक्ष)- ९४२३३०१५८४, ९४२१६४६१५३,
अमेय अ. लेले (ग्रंथपाल) – ९४२०६८४६१२, विवेक म. जाधव – ९४२०७६३०१९ संपर्क साधावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष श्री. सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे.
