बांदा/प्रतिनिधी-:रोट्रॅक क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १५ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नं. १ येथे सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. या रक्तदान शिबिरात गोवा बांबोळी येथील ब्लड बँक रक्त संकलन करणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
