*सिंधुरत्न योजनेअंतर्गत दुग्ध उत्पादनासाठी प्रत्येक गावात दुग्ध संचय चीलिंग प्लांट उभारणार

*१०० कोटीची करण्यात आली तरतूद; खा. विनायक राऊत यांची माहिती*

*💫सावंतवाडी दि.२१-:* सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी महाविकासआघाडी ने सुरु केलेल्या सिंधुरत्न योजने अंतर्गत दुग्ध उत्पादनासाठी प्रत्येक गावात एक दुग्ध संचय चिलिंग प्लांट उभा करण्यात येणार असल्याची माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली आहे. या योजनेकरिता शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे देखील माहिती खासदार विनायक राऊत यांनी कलंबिस्त येथे बोलताना दिली आहे. तर लवकरच दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे एमआयडीसी सुरू केली जाणार आहे गोव्यातील चार उद्योजकांशी याबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले कलंबिस्त गावातील रबर प्लांटेशन च्या जागी प्रदूषण मुक्त प्रकल्प आणण्यासाठीही विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले खा राऊत कलंबिस्त येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात बोलत होते त्यांच्या हस्ते सैनिकी गाव असलेल्या कलंबिस्त मधील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने झालेल्या या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी शिवसेना सावंतवाडी मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत तालुकाप्रमुख रूपेश राऊळ रूपा सार्वंत रूची राऊत गीतेश राऊत शिवसेना तालुका महिला संघटक अपर्णा कोठावळे अमित वेंगुर्लेकर उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोठावळे उपतालुकापमुख संदीप माळकर अभिमन्यू लोंढे हरिश्चंद्र पवार ओवळीचे उपसरपंच विनायक सावंत रमेश सावंत सरपंच शरद नाईक दुग्ध सहकारी संस्थेचे संस्थाध्यक्ष ऍड संतोष सावंत आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा रुग्णालयातील उषा यशवंत गावडे आरोग्य सेविका मानसी गोपाळ गावडे स्टाफ नर्स सुप्रिया कृष्णा पास्ते अश्विनी अर्जुन सुखी श्रद्धा संदीप सावंत कोविड सेंटर राधिका कृष्णकांत सावंत वृंदा रमाकांत सावंत दीप्ती दशरथ पास्ते आशा सेविका सरपंच शरद नाईक सांगेली सरपंच डॉ मनस्वी राऊळ धोंडी पास्ते तलाठी सयाजी पवार तलाठी कर्नल अरुण सावंत रेशन दुकानदार महेश पास्ते पोलीस हवालदार श्री आरोसकर वायरमन विष्णू पास्ते वायरमन हनुमंत पास्ते वायरमन लक्ष्मण राऊळ साधना सावंत पुंडलीक राणे शंकर सावंत महादेव कलमिस कर मयुरी कलमिसकर डॉ अर्जुन म्‍हाडगुत रमाकांत राऊळ पत्रकार अभिमन्यू लोंढे पत्रकार हरिश्चंद्र पवार अपर्णा कोठावळे तलाठी घाडीगावकर ग्रामसेवक फुंदे आदींचा सन्मान करण्यात आला

You cannot copy content of this page