कारचे मोठे नुकसान…!
*💫कणकवली दि.२१-:* मुंबई गोवा महामार्गावर जाणवली पुलावर बुलेट दुचाकी व कारमध्ये अपघात झाला.ही घटना 6.30 वा.सुमारास घडली.कारचालक चौपदरीकणावरून कोल्हापूरला जात होता.या दरम्यान बुलेट चालक या गाडीच्या पुढे होता.अचानक बुलेट बंद पडल्याने हायवेच्या मध्येच थांबली. मागून येणाऱ्या कारची धडक बसून हा अपघात झाला.यात कारचे मोठे नुकसान झाले तर सुदैवाने दुचाकीस्वाराचे प्राण वाचले. या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात दाखल झाली नसून चर्चेतून प्रश्न मिठवण्याचे प्रयत्न चालू आहेत. अपघातस्थळी प्रसन्ना देसाई,मिलिंद केळुसकर,चंद्रशेखर पहुजा,परेश आचरेकर,सुरेश मालविया आदींनी मदत कार्य केले.
