चौके येथील रिक्षाचालकांचा राहत्या घरात सापडला मृतदेह

मालवण दि-: मालवण तालुक्यातील चौके मांडखोलवाडी येथील श्यामसुंदर काशिनाथ पार्टे या ४६ वर्षीय रिक्षा चालकाचा मृतदेह आज रविवारी सकाळी त्यांच्या रहात्या घरी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे . त्यांच्या घराच्या परिसरात दुर्गंधीयुक्त वास सुटल्यानंतर हा प्रकार उजेडात आला याबाबतचे अधिक वृत्त असे की, चौके -मांडखोलवाडी येथील रिक्षा चालक असणाऱ्या श्यामसुंदर पार्टे यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपला रिक्षाव्यवसाय बंद ठेवला होता त्यांना दारुचे व्यसन असल्याने घरातील लोकांबरोबर त्याचे भांडण व्हायचे गेले दोन महिने शामसुंदर हा एकटाच घरी राहत होता. गेल्या बुधवार पर्यंत काहीजणाना दिसलेला श्यामसुंदर पुन्हा दिसला नव्हता. रविवारी घराशेजारी रस्त्यावर कुजट वास आल्याने ग्रामस्थांनी पोलीस पाटील श्री. गावडे यांना बोलवले. यावेळी मागील दरवाजा उघडा असल्याने आतमध्ये गेल्यावर श्यामसुंदर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. सदर घटनेची माहिती मालवण पोलिस ठाणे येथे देण्यात आली. यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत फार्णे, पोलिस काँन्टेबल विलास टेंबुलकर, सुभाष शिवगण यांनी सदर घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. त्याच्या पश्यात पत्नी, पाच मुली व एक लहान मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे..

You cannot copy content of this page