*💫मालवण दि.२१-:* गृहमंत्री अनिल देशमुख हाय हाय…, ठाकरे सरकार हाय हाय …ठाकरे सरकार बरखास्त करा , अनिल देशमुख राजीनामा द्या अशा जोरदार घोषणाबाजी करीत आज कालावल पुलावर मालवण तालुका भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देत सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हे आंदोलन सनदशीर मार्गाने करण्यात आले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देऊन एकच खळबळ उडवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा या मागणीकरिता मालवण तालुका भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील हडी येथील कालावल पुलावर आंदोलन केले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपचे झेंडे फडकवीत गृहमंत्री अनिल देशमुख व ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, महेश मांजरेकर, संतोष गावकर, सागर पोयरेकर, प्रकाश तोंडवळकर, दादा नाईक, दत्ता वराडकर, समीर बावकर, नंदू हडकर, लोके, दीपक सुर्वे, संजय लोके, चंदू सावंत आदी व इतर उपस्थित होते. हे आंदोलन पोलीस बंदोबस्तात करण्यात आले. यावेळी मालवणचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. काळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी वेळोवेळी आवाज उठविला. मात्र ठाकरे सरकार सचिन वाझेना पाठीशी घालत आहे. याच प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. ठाकरे सरकार कडून लाचखोरी सुरू असून आज पैसे घेतल्याशिवाय कामे केली जात नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच ठाकरे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी भाजपची मागणी असल्याचे चिंदरकर म्हणाले.
कालावल पुलावर मालवण भाजप तर्फे राज्य सरकारचा निषेध
