Headlines

औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १२ बलुतेदार यांना शासकीय भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी…

श्री.मामा माडये यांची किरण सामंत यांच्याकडे मागणी:आपल्या मागणीचा नक्कीच विचार करू; भैय्या सामंत ग्वाही..

⚡कुडाळ ता.०३-: भंडारी माजी जिल्हाध्यक्ष श्री.मामा माड्ये यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १२ बलुतेदार यांना शासकीय भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी श्री.मामा माडये यांनी
शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याजवळ केली आहे.दरम्यान आपल्या मागणीचा आपण नक्कीच विचार करू अशी ग्वाही श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी दिली.

यावेळी शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी नुकतीच भंडारी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजयजी आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना खजिनदार श्री.भास्कर राणे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.हरेश पाटील यांनी भंडारी समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री.मामा माडये यांची कट्टा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

तसेच श्री.मामा माडये यांनी सांगितले की,ही मागणी पूर्ण केल्यास व आपण व आमचे समाज बांधव पाठीशी असल्याची ग्वाही भंडारी समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री.मामा माडये यांनी दिली.

You cannot copy content of this page