मुळदे तपोभूमी येथे महाशिवरात्र उत्सव ६ मार्च पासून…

⚡कुडाळ ता.०३-: ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, तपोभूमी, मुळदे, कुडाळ येथील नवनाथ उपासक प.पू. श्री. बाळकृष्ण घडशी महाराज यांच्या तपोभूमी, मुळदे येथे बुधवार दि. ६ मार्च ते ८ मार्च पर्यंत महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यामध्ये बुधवार दि. ०६ ते ०८ मार्च पर्यंत शिव लिला पारायण होणार आहे. शुक्रवार दि. ०८ मार्च रोजी सकाळी काकड आरती, सकाळी ११ ते १२ श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, सकाळी ११ ते १ वा.श्री. ह.भ.प. सामंत बुवा यांचे कीर्तन, दुपारी ३ ते ६ वा ह.भ.प. वासुदेव कृष्णा सडवेलकरबुवा आंदुर्ले यांचे कीर्तन, रात्रौ. ७ ते ८ वा.निवजेकर प्रासादिक भजन मंडळ, निवजे (पिंगुळकर बुवा) यांचे भजन रात्री ८ ते ९ वा.
पालखी प्रदक्षिणा, रात्रौ. ९ ते ११ वा. महाप्रसाद, रात्रौ. ९ ते ११ वा हरिपाठ सादरकर्ते वेताळ बांबर्डे (कदमवाडी) यांचा कार्यक्रम तरी सर्व भक्तभाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सेवेचा व सर्व कार्यक्रमांचा,महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ॐ श्री नवनाथ उपासक प.पू.श्री.बा.म. घडशी महाराज, तपोभूमी, मुळदे यांनी केले आहे .

You cannot copy content of this page