न्हावेली येथे सोलर लाईटचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या हस्ते लोकापर्ण..
⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-: मनसे नेते राज्य सरचिटणीस संदिप दळवी यांच्या माध्यमातुन न्हावेली गावातील भटाचे टेंब येथे सोलर लाईटचे लोकापर्ण मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
गावातील ग्रामस्थांची सोलर लाईटची मागणी लक्षात घेता मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर आणि आरती माळकर यांनी या सोलर लाईटसाठी विशेष पाठपुरावा केला होता. न्हावेली ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या सोलर लाईट लोकार्पणावेळी मनसे विभाग अध्यक्ष तथा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, न्हावेली ग्रामपंचायत सदस्य आरती माळकर, चेतन पार्सेकर, नवनाथ पार्सेकर, प्रथेमश नाईक, सत्यवान गावडे, अजय नाईक, समीर पार्सेकर, प्रसाद गावडे, दत्तप्रसाद पार्सेकर, राज धवन, अमोल पार्सेकर, दीपक बरकुटे, भूषण पार्सेकर, बंटी धवन, किशोर पार्सेकर, भावेश पार्सेकर, अजय पार्सेकर, धनेश नाईक, कुणाल पार्सेकर, ओमकार निर्गुण, बाळु सांवळ, राकेश न्हावेलकर, दीपक पार्सेकर, मनसे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्हावेली येथे विकासाची गंगा मनसेच्या माध्यमातुन सुरू आहे. न्हावेली ग्रामस्थांच्यावतीने मनसे कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
