मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंतरत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये भाजपासाठी चांगले वातावरण..
⚡सावंतवाडी ता.०३-: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड न करता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ कमळ चिन्हावरच लढवून तो जिंकला जाणार आहे. त्यामुळे कोकणावर पुन्हा अन्याय होणार नाही अशी खात्री लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख गोवा राज्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी आज येथे दिली.
तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये भाजपासाठी चांगले वातावरण आहे या वातावरणाचे रूपांतर मतामध्ये होण्यासाठी सर्वांनी कामाला लागा असे सांगत अबकी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार असा नारा ही त्यांनी यावेळी दिला.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे बुथस्तरीय कार्यकर्ते संमेलन आरपीडी हायस्कूलच्या सभा मंडपात पार पडले यावेळी व्यासपीठावर माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सामंत माजी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजन तेली, पहिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष लखमराजे भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर रणजित देसाई प्रमोद जठार बाळू देसाई संजू परब महेश सारंग आनंद नेवगी अजय गोंदावळे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
