सावंतवाडी भटवाडी येथे उद्यापासून क्रिकेट स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.०१-: संदीप फ्रेंड्स, शेखर सुभेदार मित्रमंडळ भटवाडी व ग्रामस्थ आयोजित स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा २०२४ वर्ष ३ रे व भटवाडी प्रीमियर लीग वर्ष ७ वे
शेखर सुभेदार यांच्या संकल्पनेतून स्मृती चषक स्पर्धा दिनांक २ व ३ मार्च रोजी येथील वि. स. खांडेकर मैदान येथे होणार आहे.
गेली ४० वर्षे प्ले बॉईज स्पोर्ट्स भटवाडी व ग्रामस्थ वेगवेगळ्या उपक्रमांसह क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे. या स्पर्धेचा सर्व क्रिकेट रसिकांनी व भटवाडी ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शेखर सुभेदार मित्रमंडळतर्फे करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेसाठी गंधार वॉरियर्स, श्रीनिका स्पोर्ट्स, रोहिणी स्पोर्ट्स, शिव स्पोर्ट्स, अवर लेडी ऑफ फातिमा, स्वराज स्पोर्टस या संघांचा समावेश आहे. कोरोना काळापासून भटवाडीतील आपली आपुलकीची जिव्हाळ्याची माणसे अचानक सोडून गेली. त्यांच्या स्मृतींना उजाळा व आठवण म्हणून आदरांजली देण्यासाठी स्मृती चषक भटवाडी प्रेमियर लीगचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. शनिवार दिनांक २ मार्च व रविवार दिनांक ३ मार्च होणार आहे.

You cannot copy content of this page