⚡कणकवली ता.०१-: जि. प. शाळा कलमठ बाजारपेठ क्र.१ या शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्या निमत्ताने कुडाळ – मालवणचे आम.वैभव नाईक आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी शाळेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
आम.वैभव नाईक यांनी
कलमठ बाजारपेठ शाळा क्र.१
मुख्याध्यापक श्रीमती मधुरा सावंत , शिक्षक प्रमोद पवार ,प्रदीप मांजरेकर,श्रीमती विद्या लोकरे ,
श्रीमती इंदू डगरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अमोल कोरगांवकर
आणि नंदकुमार हजारे यांचे कौतुक करत शाळेची पाहणी केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्योजक रामदास विखाळे , किरण हून्नरे,माजी सरपंच निसार शेख,विलास गुडेकर
ग्रामपंचायत सदस्य धीरज श्रीधर मेस्त्री,सचिन खोचरे,अर्चना कोरगांवकर,इम्तियाज फकीर सुशील कोरगांवकर,राजू कोरगांवकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
