⚡कणकवली ता.२९-: आंगणेवाडी भराडी देवीच्या जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सिंधुदुर्ग पोलीस चांगली सेवा देतात.तसेच दिवस रात्र बंदोबस्तात वाहतुकीचे सुरळीत नियोजन करुन प्रवास सुरळीत करतात.या पार्श्वभूमीवर कणकवली येथील माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कणकवली किशोर सावंत यांची भेट घेतली.आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पोलिस बांधवांसाठी पाणी बाॅटल माऊली मित्र मंडळाच्या वतीने सुपूर्द केल्या .
यावेळी कणकवली पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक मनोज पाटील आणि पोलिस कर्मचारी यांच्यासह माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर,सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, सुभाष उबाळे,अविनाश गावडे,प्रभाकर कदम, आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर म्हणाले, दिवसभर उन्हात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिस बांधवांचा घसा हि यावेळी कोरडा पडतो.पोलिस हे सुद्धा माणूसच आहेत. माणुसकीच्या भावनेतून त्यांना पाणी बाॅटल देऊन सेवाभावी ओलावा निर्माण करण्याचे काम कणकवली माऊली मित्र मंडळाने केले आहे.
