⚡कणकवली ता.२९-: मिळून साऱ्याजणी महिला मंचचे अखंडित कार्यक्रमाचे हे 22 सावे वर्ष आहे.शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीच्या वतीने जागतिक महिला दिनाचा आनंद सोहळा साजरा करणार आहेत. यानिमित्ताने महिलांचे विविध कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
यामध्ये पाककला स्पर्धा दुपारी 3 ते 4 यामध्ये उपवासाचा कोणताही पदार्थ घरून बनवून आणायचा आहे.विजयी क्रमांकात येणाऱ्या स्पर्धकास आकर्षक बक्षिस,
सन्मानचिन्ह तसेच स्पर्धेमध्ये
भाग घेणाऱ्या स्पर्धकास भेटवस्तू दिली जाईल.
समाजासाठी विशेष काम करणाऱ्या, योगदान देणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार.मान्यवरांच्याहस्ते उद्योगिनी पुरस्कार
चार्मिंग लेडी स्पर्धा-कोणत्याही वयोगटातील विवाहित महिलांसाठी स्पर्धा असून यात भाग घेणाऱ्या महिलांना पाच दिवसाचे ट्रेनिंग मोफत दिले जाईल. तसेच विजेत्यांना आकर्षक बक्षीस, सन्मानचिन्ह दिले जाईल.तसेच सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू दिली जाईल.
महिलांचे डान्स, एकपात्री, नाटिका, प्रेक्षकांमध्ये लकी ड्रॉ, प्रेक्षकांमधून उत्स्फूर्त सहभाग आणि अनेक आनंददायी कार्यक्रमांची रेलचेल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मिळून साऱ्याजणी महिला मंचच्या कार्यक्रमात असणार आहे. चार्मिंग लेडी किंवा पाककला स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुक महिलांनी 9823496166 मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, अथवा मिळून साऱ्याजणी महिला मंचच्या सदस्याशी संपर्क करावा.
दरवर्षीप्रमाणेच याही 22व्या वर्षी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, महिलांना प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती मिळून साऱ्याजणी महिला
मंचतर्फे करण्यात येत आहे.
