शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण करीत पकडला गळा…

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मागितली माफी:समाजात व्यक्त होत आहे संताप

कुडाळ, प्रतिनिधी

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा शाळेचा विषय चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील नामांकित शाळेतील शिक्षकाचा प्रताप समोर आला आहे. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शिक्षक विद्यार्थ्याला जबरदस्त मारहाण करताना दिसत असून त्यात शिक्षकाने त्या विद्यार्थ्याचा अक्षरशः गळाच धरल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी काकुळतीला आला असताना सुद्धा त्या शिक्षकाने त्याला मारहाण करणे थांबविले नाही. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याचे घर गाठून माफी मागितली, अशी चर्चा सुरू आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याच जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने सर्वत्र खळबळ उडालीय.

You cannot copy content of this page