मिलाग्रिस हायस्कूल येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता.२९-: मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी डॉ.सी .व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी नंदिनी राऊळ हिने विज्ञान दिनाविषयी माहिती सांगितली.प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.ज्योत्स्ना सावंत यांनी अतिशय समर्पक शब्दात विज्ञान दिनाविषयी माहिती सांगितली.

त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.रोझा फर्नांडिस यांनी केले तर आभार प्रसारित शिक्षक श्री सुशांत जोशी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page