‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ या उपक्रमामध्ये मिलाग्रीस हायस्कूल द्वितीय…

⚡सावंतवाडी ता.२८-: महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘उपक्रम राबविण्यात येत असून माध्यमिक विभागामध्ये सावंतवाडी तालुक्यातील मिलाग्रिस हायस्कूल ला तालुकास्तरीय मूल्यमापन समितीच्या परीक्षण अहवालात सावंतवाडी तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमा अंतर्गत मूल्यमापन समितीच्या निकालानुसार विजेत्या शाळांना रोख रकमेची पारितोषिके देखील शासनाने जाहीर केलेली आहेत. प्रशालेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल प्रशालेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी घेत असलेले परिश्रम तसेच विद्यार्थी व पालकांचे सहकार्य यामुळे आपल्या शाळेला हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया दिली.

You cannot copy content of this page