आजगाव-येथील समुहगीत गायन स्पर्धेत आजगाव प्राथमिक शाळा ठरली अव्वल…

⚡सावंतवाडी ता.२८सहदेव राऊळ-: लोककल्याण शिक्षण संस्था, मुंबई संचलित आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये रविवारी कै. गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या स्मृती प्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या समुहगीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजगाव नं. १ ने प्रथम क्रमांक पटकाविला.

स्पर्धेत द्वितीय क्रमांक वाडोस हायस्कूल कुडाळ तर तृतीय क्रमांक स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी यांनी मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक तिरोडा शाळा नं. १ शाळेला देण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन तर विद्यार्थांच्या स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना चषक, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच यशस्वी शाळांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कौतुक केले. माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा.गो. सामंत यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी शाळा समिती अध्यक्ष अण्णा झाट्ये, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अनंत पांढरे, ट्रेनिंग कॉलेजचे तुंगार सर, सेवानिवृत्त शिक्षक केदार सर, तिरोडा शाळेचे प्रभू सर, प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत तसेच सहभागी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शेखर पणशीकर, संगीत विशारद वैष्णवी प्रभू यांनी काम पाहिले. प्रशालेच्या शिक्षिका काव्या साळवी यांनी प्रस्तावना तर मानसी परूळेकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page