⚡सावंतवाडी ता.२८-: शालेय शिक्षणमंत्री तथा मराठी भाषा मंत्री म. दीपक केसरकर यांच्या स्थानिक आमदार निधी मधुन मंजूर सांगेली घोलेवाडी मुख्य रस्ता ते शशिकांत इळेकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे उदघाट्न शिवसेना जिल्हप्रमुख मा श्री अशोक दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नारायण राणे, त्याचबरोबर माडखोल जि. प.विभागप्रमुख श्री.अब्जु सावंत, श्री.जीवन लाड, शाखाप्रमुख श्री.जयवंत सावंत महिला जिल्हा प्रमुख सौ. निता कविटकर मॅडम, विलास इळेकर, अभय किन्लोस्कर, आईर काका सोबत मोठया संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. गावाच्या विकासाला सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं
