कणकवलीतील ऑन ड्यूटी पोलिसांला जीवे मारण्याचा प्रयत्न
*💫कणकवली दि.२०-:* ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे जाळण्याच्या गुन्ह्यातील घटनास्थळाचा डीवायएसपी डॉ.नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी एपीआय सागर खंडागळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे जाळण्याच्या गुन्ह्याची एसपी दाभाडे यांनी गंभीर दखल घेतली असून तात्काळ कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार फॉरेन्सिक लॅब च्या पथकाने आज रात्री साडे नऊच्या सुमारास पटवर्धन चौकात घटनास्थळी भेट दिली. पेट्रोल ओतण्यासाठी वापरलेली प्लास्टिक बाटली,आरोपीच्या पायातील बूट घटनास्थळी आढळून आले आहेत. आरोपीच्या ताब्यातील दुचाकीही घटनास्थळी होती. दरम्यान आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या आधारकार्डवरील जन्मतारीखेनुसार आरोपीचे वय 17 वर्षे 8 महिने असल्याचे समजते. आरोपीच्या जन्मतारीखेची पडताळणी केली जाणार आहे. आरोपीवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा.दं. वि.307, शासकीय कर्मचाऱ्यावर ऑन ड्युटी असताना हल्ला केल्याप्रकरणी भा.दं. वि.353 व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
