*💫वेंगुर्ला दि.२०-:* वेंगुर्ला, कॅम्प-देऊळवाडा येथील रहिवासी व महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, टाईम्स ऑफ इंडिया, इंडिया टूडे या मोठ्या वृत्तपत्रांचे सर्वात जेष्ठ विक्रेते कमलाकर अनंत वारंग (६०) यांचे मुंबई-बदलापूर येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात, पत्नी, आई, मुलगा, मुलगी, सून, जावई, तीन भाऊ, बहिणी, भावजया, पुतणे, नातवंडे असा परीवार आहे. विद्युत वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त लाईनमन मनोहर वारंग, युनियन बँक ऑफ इंडिया, वेंगुर्ला शाखेतून सेवानिवृत्त झालेले कॅशियर शशिकांत वारंग व आंबा बागायतदार प्रभाकर वारंग यांचे ते भाऊ तर दै. सामनाचे वेंगुर्ला प्रतिनिधी विनायक वारंग यांचे ते काका होत. त्यांच्या या आकस्मित निधनाबद्दल वेंगुर्ला शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते कमलाकर वारंग यांचे निधन…
