शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात अज्ञातांकडून लावण्यात आलेले फलक..
⚡वेंगुर्ला ता.१८-: निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात काही अज्ञातांकडून लावण्यात आलेले फलक लक्ष वेधून घेत आहेत. यात भाई आता खरच पुरे झाला थांबा असे त्यांना आवाहन करण्यात आले आहे.
‘भाई आता खराच पुरे झाला, थांबा आता..!! पाच वर्षात जसा आमका तोंड दाखवक नाय तसे हेच्या पुढे येव नकात आता कोपरापासून हात सोडून सांगतवं तुमका...!! अशा आशयाचा संदेश देणारे फलक सध्या म्हापण, परूळे, भोगवे परिसरात अज्ञाताकडून लावण्यात आले आहेत. तर मागच्या निवडणुकीत चिपी विमानतळावर दोन हजार पोरा पोरींका नोकरी देतालास असा सांगितलं, पाच वर्षात एकाही माणसाक नोकरी काय लागाक नाय पण असले एक एक गजाली सांगून आमची मता मात्र घेतलास असा चिमटा काढणारा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे.
शेजारच्या मालवणचा विकास झाला तो तालुका पर्यटनाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर आला. मात्र आम्ही तुमच्या गजाली एकूण त्याच ठिकाणी राहिलो, असे त्यात म्हटले आहे. त्याआधी पर्यटन मंत्री म्हणून तुम्ही हाऊसबोट, वॉटर स्पोर्ट्स त्याचबरोबर स्थानिकांना हॉटेल, पालक अनुदान पर्यटनातून रोजगार अशा गोष्टी सांगितल्या होत्या. आम्ही खुश झालो होतो त्यानंतर मतं घातली, परंतु तुमची हाऊस बोट काय आमच्या दर्यात पोचाक नाय असे नमूद करण्यात आले आहे.
