मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपचा उपक्रम
⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ-: हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वक्तृत्व स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते चौथी गट- १) स्वातंत्र्याची प्रेरणा शिवस्वराज्य, २) राजमाता जिजाऊचे संस्कार, 3) माझे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पाचवी ते आठवी गट- १) किल्ले संवर्धन करणे काळाची गरज, २) शिवजयंती कशी साजरी करायची, ३) स्वराज्याचा शिलेदार, खुला गट-१) छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती, २) कथा आणि व्यथा श्रीमान रायगडाची, ३) छत्रपती शिवाजी महाराज आणि आताचे राजकर्ते असे विषय ठेवण्यात आले आहेत. यासाठी ६ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. तर वेशभूषा स्पर्धेत ऐतिहासिक वेशभूषा करणे आवश्यक आहे. यासाठी पांडुरंग राऊळ- ९९६७३३३१००/९६१९२०२६८७, सचिन राऊळ- ८८९८९०९१००, दिपेश राऊळ-९११२१११९८९, निलेश ठाकूर-९४०४७४८४९३, रितेश राऊळ-८७८८८७६१७३ व आनंदी फोटो स्टुडिओ-९७६३४८८५६० यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करायची आहे. जास्तीत जास्त मुलांनी या दोन्ही स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.
