⚡सावंतवाडी ता.१५-: जागतिक सूर्नमस्कार दिनाचे औचित्य साधून घे भरारी फाउंडेशनतर्फे उद्या सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, सर्वात जास्त सूर्यनमस्कार घालतील त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहेत.
तरी सर्व योगा करणाऱ्यांनी यात सहभागी व्हावे अशी विनंती घे भरारी फाउंडेशनतर्फे सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिलांना करण्यात आली आहे. उद्या दिनांक 16 फेब्रुवारी सकाळी सात वाजता भोसले शिव उद्यान मध्ये गार्डन मध्ये ही स्पर्धा होणार आहे. येताना सर्वांनी योगा मॅट व पाणी बॉटल घेऊन यायचं आहे.. वेळ सकाळी सात ते आठ असेल. यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन घे भरारी संस्था अध्यक्ष मोहिनी मडगावकर, रिया रेडीज, शारदा गुरव, सरिता फडणीस यांनी केले आहे.
