महाशिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सव…

राजन पोकळे:१७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पालिकेच्या बॅ नाथ पै सभागृहात आयोजन..

⚡सावंतवाडी, ता. १५-: शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ आणि मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडी यांच्या माध्यमातून महाशिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते राजन पोकळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू आणि नरसिंह शिवराय ही तीन ऐतिहासिक नाटके सादर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मातृभूमी शिक्षण संस्थेच्या प्रमुख डॉ. सोनल लेले, कलाकार मिलिंद कासार, भरत गावडे आदी उपस्थित होते.
पोकळे पुढे म्हणाले, शिवराज्यभिषेक सोहळ्याचे
औचित्य साधून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या नाट्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पालिकेच्या बॅ नाथ पै सभागृहात होणार
आहे. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता या महोत्सवाचे उदघाटन होणार असून त्यानंतर “रायगडाला जेव्हा जाग येते” हा नाट्यप्रयोग होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता संभाजी महाराजांच्या जीवनावरील “इथे ओशाळला मृत्यू” हा नाट्यप्रयोग तर १९ फेब्रुवारी रोजी शिवपूजन व सांगता सोहळा” होणार आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता “नरसिंह शिवराय” हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे, असे पोकळे यांनी सांगितले. या महोत्सवात मोफत प्रवेश असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन शिवसंस्कारच्या प्रमुख डॉ. सोनल लेले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page